Top news मनोरंजन

नेहा कक्करच्या लग्नाची वार्ता ऐकताच नेहाचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली म्हणाला…

मुंबई | सिंगर नेहा कक्कर नेहमीच व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहलीच्या प्रेमाची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र, काही कारणानं दोघांचं ब्रेक अप झालं आणि नेहा दुःखात बुडाली होती. आता पुन्हा एकदा नेहाच्या नव्या प्रेमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

नेहा कक्कर तिचा मित्र आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंह बरोबर लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार नेहा येत्या 24 ऑक्टोबरला रोहनप्रीत बरोबर लग्न करणार आहे. नेहाच्या लग्नाची वार्ता ऐकून तिचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली यानं एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेहा जर खरंच लग्न करत असेल तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. नेहा तिच्या आयुष्यात आता पुढे चालली आहे. तिच्या आयुष्यात असं कोणीतरी आहे हे ऐकून आनंद होत आहे, असं हिमांश कोहलीनं म्हटलं आहे.

तसेच रोहन प्रीत कोण आहे, हे आपल्याला माहित नसल्याचंही हिमांशनं यावेळी म्हटलं आहे. मात्र, नेहा कक्करच्या आनंदात तो ही आनंदी आहे, अशी भावना त्यानं मुलाखती दरम्यान व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी हिमांश आणि नेहा त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे सतत चर्चेत होते. या दोघांनीही यावेळी एकमेकांवर आरोप केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी एकमेकांविरुद्ध राग व्यक्त केला होता. मात्र, आता हे दोघेजण  आपापल्या आयुष्यात सर्व विसरून पुढे चालले आहेत.

दरम्यान, अद्याप रोहनप्रीत आणि नेहाच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. यामुळे नेहा आणि रोहनप्रीतच्या नात्याबद्दल येणाऱ्या काळातच सत्य समजेल.

काही दिवसांपूर्वी रोहनप्रीतनं एक म्युझिक व्हिडीओ बनवला होता. यामध्ये नेहा रोहनप्रीतला डायमंड रिंग मागत लॉकडाऊनच्या काळात लग्न करण्यास सांगत आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीतच्या या गाण्याला सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलं जात असून त्यांच्या लग्नाची ही हिंट समजली जात आहे.

रोहनप्रीत सिंह हा एक पंजाबी गायक असून त्याने आत्तापर्यंत अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. 2007 मध्ये रोहानप्रीतनं ‘सारेगमप लिटील चॅम्पस’मध्ये भाग घेतला होता. या शोचा तो प्रथम रनर अप ठरला होता. तसेच रोहनप्रीतनं 2018 मध्ये ‘राइज‍िंग स्टार 2’मध्येही भाग घेतला होता. इथेही आपल्या आवाजाची जादू चालवत तो प्रथम रनर अप ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाचा निर्णय

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! ‘या’ बड्या दिग्दर्शकाचं नि.धन

नोरा फतेहीचा ‘प्यार दो, प्यार लो’ गाण्यावर जलवा, असा डान्स तुम्ही पाहिलाच नसेल!

स्पर्धेच्या मध्यातच दिल्लीच्या संघानं बदलली जर्सी; नवी जर्सी पहाल तर फिदा व्हाल!

अभिनेता अजय देवगनला मोठा धक्का; घरातील ‘या’ खास व्यक्तीला कायमचं गमावलं!