सिध्दार्थच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् ती कोमात गेली, वाचा सविस्तर

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सिध्दार्थचा अकाली झालेला मृत्यू हा अनेकांना धक्का देऊन गेला आहे. सिध्दार्थच्या अनेक चाहत्यांचा अद्याप देखील सिध्दार्थच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास बसत नाही.

सिध्दार्थच्या मृत्यूची बातमी त्याच्या चाहत्यांसाठी असहाय्य झाली आहे. अशातच आता सिध्दार्थचा मृत्यू झाल्याचं कळताच एक तरुणी कोमात गेल्याची बातमी समोर आली आहे. सिध्दार्थचे मित्र डॉक्टर जयेश ठाकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

जयेश यांनी यासंबंधीत एक ट्विट केलं आहे. जयेश ठाकर म्हणाले की, सिध्दार्थची एक चाहती बाथरूममध्ये पडली होती. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी ती अंशतः कोमात गेल्याचं सांगितलं आहे. जास्त तणावामुळे माणूस असा कोमात जातो.

सिध्दार्थच्या चाहतीसाठी हे दुःख असहाय्य होतं. मला वाटतं प्रत्येक चाहत्याने आता स्वतःला सावरायला हवं. आता प्रत्येकानं शांत झालं पाहिजे. मला माहितेय हे सर्व सोपं नाही परंतु स्वतःला जपायला हवं. झालेल्या घटनेनं स्वतःला विचलित होऊन देऊ नका. स्वतःला सावरा, असं जयेश ठाकर यांनी म्हटलं आहे.

तसेच मित्रांनो तुमच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी बोला. एकटे राहू नका. स्वतःला मोकळे होऊ द्या आणि सिध्दार्थच्या या चाहतीसाठी प्रार्थना करा, असं देखील जयेश ठाकर यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थने 2004 साली आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरूवात केली होती. सिद्धार्थला मॉडेलिंग आणि अभिनयामध्ये फारशी आवड नव्हती. परंतू त्याच्या लूकमुळे केवळ आईच्या सांगण्यावरून त्यानं एका मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. तिथून त्याच्या करिअरला सुरूवात झाली.

डिसेंबर 2005मध्ये तुर्कीमध्ये मॉडेलिंगची स्पर्धा झाली होती. त्यामध्ये आशिया लॅटिन, अमेरिका, यूरोपमधील एकूण 40 जणांनी सहभाग घेतला होता. या 40 जणांना मागे टाकत सिद्धार्थने जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलंच विजेते पद पटकावलं होतं.

https://twitter.com/JThakers/status/1433660169414582272?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1433660169414582272%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fentertainment%2Factor-sidharth-shukla-death-fan-goes-in-coma-after-hearing-of-his-demise-rp-600183.html

महत्वाच्या बातम्या-

डॉक्टरांनी सिद्धार्थला ‘या’ गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं परंतु…

शहनाजच्या मांडीवर सिद्धार्थने घेतला अखेरचा श्वास?

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजची अवस्था पाहून तुम्हाला देखील अश्रू अनावर होतील, पाहा फोटो

‘या’ बड्या अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता सिद्धार्थ शुक्ला

‘या’ सीनमुळे नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला स्लट शेमिंगला सामोर जावं लागलं