भावाच्या अटकेनंतर सुहाना खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई | अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे, ती अनेकदा तिचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करायला विसरत नाही. पण आता भावाच्या अटकेनंतर लोक सोशल मीडियावर सुहाना खानला ट्रोल करू पाहत आहेत. यामुळे सुहाना खानने मोठा निर्णय घेतला आहे.

सुहाना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये कमेंट सेक्शन बंद केला आहे. जेणेकरून कोणीही तिच्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. तत्पूर्वी तिचे कमेंट सेक्शन खुला होता. या काळात परदेशात राहून सुहाना आपले शिक्षण पूर्ण करत आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कारागृहात असणाऱ्या आर्यन ड्रग्स प्रकरणात कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने अभिनेत्याच्या मुलाला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात ठेवण्यास सांगितलं आहे. तो 7 ऑक्टोबरला पुन्हा हजर होईल. आर्यनच्या तुरुंगवासानंतर शाहरुख खानच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केलं आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचं सेवन केलं आहे. चौकशीत असं समोर आलं आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता.

दरम्यान, चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आलं आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती.

महत्वाच्या बातम्या-

मधुमेही रूग्णांंनी आहारात ‘या’ फळांचा समावेश करावा, साखर नियंत्रणात राहिल

वृद्ध दाम्पत्याचा चिलम फुंकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘या’ कंपनीचे शेअर्स घेतलेले गुंतवणूकदार सहा महिन्यांत झाले बक्कळ मालामाल!

पेट्रोल महाग झालं म्हणून तरूणाने केला ‘हा’ अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ

पन्नास रुपये गुंतवून सलूनवाला असा बनला रातोरात करोडपती!