मुंबई | शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर आता महाविकास आघाडी (MVA) देखील इतिहासजमा होणार का? असे चित्र राज्याच्या राजकारणात तयार झाले आहे.
कारण विरोधी पक्षनेतेपदावरुन सध्या महाविकास आघाडीत रुसवे फुगवे सुरु आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी औरंगाबादेतील एका कार्यक्रमात महाविकास आघाडीवर भाष्य केले आहे.
महाविकास आघाडी ही कोणतीही नैसर्गिक युती नाही, किंवा पर्मनंट आघाडी नाही. एका विचित्र परिस्थितीत आम्ही एकत्र आलो होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्याकडे आले होते, त्यामुळे आम्ही युतीत आलो, असे पटोले म्हणाले.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) देखील नाराज असल्याचे कळत आहे. जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती करताना, शिवसेनेने इतर दोन पक्षांसोबत चर्चा करायला हवी होती.
त्यांनी इतर दोन पक्षांसोबत चर्चा करुन निर्णय घेतला असता, तर ते अधिक चांगले दिसले असते. पण शिवसेनेने तसे केले नाही. ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आहे, त्यांचा विरोधी पक्षनेता होतो, अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
विरोधी पक्षनेता जरी जास्त संख्या असलेल्या पक्षाचा असला, तरी तो सर्वांच्या पाठिंब्याची अपेक्षा करत असतो. त्यामुळे सर्व घटक पक्षांच्या चर्चा आणि संगनमताने तो निवडला गेला पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.
विधान परिषद विरोधीपक्षनेते पदी शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती केली गेली. त्यानंतर या नाराजी नाट्याला सुरुवात झाली. खरे तर काँग्रेसला विधान परिषद विरोधीपक्षनेतेपद हवे होते.
महत्वाच्या बातम्या –
“ईडी कारवाई मागे लागलेल्या भावना गवळींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली”
आघाडीत बिघाडी?, महाविकास आघाडीबाबत नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
‘आरती करा त्या संजय राठोडाची’, पूजा चव्हाणची आजीची संतप्त टीका
‘कसला बोगस विनोद करताय?’, मोदींचा तो दावा नितीश कुमारांनी फेटाळला
‘आता माझ्या विरोधात काही बोललात तर…’, चित्रा वाघ विरोधात संजय राठोड आक्रमक