…म्हणून आम्ही मॅच हरलो; विराटने सांगितलं पराभवाचं कारण

मँचेस्टर |  अत्यंत महत्वाच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकार परिषद घेत पराभवाची कारणे स्पष्ट केली आहेत.

विश्वचषकात भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. विराटने आघाडीच्या फलंदाजांची निष्किय ठरलेली फलंदाजी हे प्रमुख कारण सांगितलं आहे. शिवाय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली, असं तो म्हणाला.

वाईट वाटतं आहे. जेव्हा तुम्ही संपुर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करता आणि शेवटच्या 5 मिनिटांत तुम्ही स्पर्धेबाहेर होता…., अशी भावूक प्रतिक्रिया विराट कोहलीने व्यक्त केली आहे.

आम्ही फक्त 45 मिनिटांच्या खेळीमुळे हरलो, असं म्हणत त्याने सुरूवातीच्या फलंदाजांनी केलेल्या चुकांची आठवण केली. तसेच त्याने भारतीय पाठीराख्यांचे भरभरून प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.

आता इंग्लंड आणि ऑस्टेलियामध्ये दुसरी सेमी फायनल रंगणार आहे. यांच्यात जो जिंकेल त्या संघाची गाठ फायनलमध्ये न्यूझीलंडशी पडणार आहे.

दरम्यान, टॉप ऑर्डरची उडालेली घसरगुंडी, मधल्या फळीतल्या फलंदाजांची खराब कामगिरी यामुळे भारताला पराभवाचं तोंड पहावं लागलं. याबरोबरच भारताचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे.