अन् नेहा कक्करचं गाणं ऐकून अनु मलिकनं घेतलं स्वतःला मारुन, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई| प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळत असते. ती कोणत्या न कोणत्या कारणांवरुन नेहमी चर्चेत असलेली पहायला मिळते. तिनं तिच्या आवाजानं सर्वांचीच मनं जिंकलेली आहेत.

नेहा कक्कर त्या सेलिब्रेटींपैकी एक आहे, जी नेहमीच चर्चेत असते. नेहा जितकी तिच्या गायनासाठी ओळखली जाते तितकीच ती डान्स आणि कामेडीमध्येही माहीर आहे. नेहा तिच्या गाण्यांनी नेहमीच धमाल करत असते. आज नेहाची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत.

सध्या नेहा इंडियन आयडलच्या 12 व्या मोसमामुळे ती चर्चेत आहे. इंडियन आयडल-12 या टीव्ही कार्यक्रमात नेहा कक्कर जजच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. यशाच्या शिखरावर पोहचलेल्या नेहाचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतं आहे.

नेहाचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. तिने सुरुवातीला अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. सध्या सोशल मीडियावर नेहाचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नेहाचे गाणे ऐकून गायक अनू मलिक यांनी स्वत:च्या कानशिलात लगावली आहे.

सध्या सोशल मीडियावर नेहाचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नेहा ‘इंडियन आयडल’ शोमध्ये ऑडिशन देत असल्याचे दिसत आहे. तिचे गाणे ऐकून तेथे उपस्थित असलेले परिक्षक अनू मलिक, फराह खान आणि सोनू निगम यांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या आहेत.

व्हिडीओत नेहा परफॉर्म करते आणि तिचे गाणे ऐकून अनु मलिक यांचा राग अनावर होतो. नेहाला मध्येच रोखत, ते तिला फटकारतात. नेहा कक्कर, तेरी आवाज सुनकर लगता है, मैं अपने मुंह पर मारूं थप्पड… यार क्या हो गया है तेरे को… असे ते म्हणतात. ते केवळ म्हणत नाही तर स्वत:च्या हाताने स्वत:च्याच गालावर थप्पडही मारून घेतात. अनु मलिक यांची ही प्रतिक्रिया पाहून नेहा प्रचंड नर्व्हस होते आणि विचित्र नजरेने जजेसकडे बघायला लागते.

व्हिडीओ अर्ध्यावर कट झाल्यामुळे अनु मलिकने अशा प्रकारे का प्रतिक्रिया दिली? नेमकं काय झालं? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. पण असे म्हटले जात आहे की नेहाने गाणे चांगले गायल्यामुळे अनु मलिकने तिला घाबरवण्यासाठी हे केले होते. अनु मलिक अनेकदा स्पर्धकांना घाबरवत असल्याचे पाहायला मिळते.

 

महत्वाच्या बातम्या – 

वाह रे मजणू! प्रियकर तब्बल 12 तास पाण्याच्या टाकीवर चढून…

जगन्नाथाच्या ‘या’ मंदिराचं कोडं आजवर वैज्ञानिकांना देखील उलगडलं नाही; वाचा सविस्तर

धक्कादायक! दिल्लीत भररस्त्यात पतीने पत्नीला चाकूने भोसकलं; व्हिडीओ व्हायरल

‘हे काय वागणं आहे सिद्धार्थ?’ लग्नाच्या दोन महिन्यात मिताली-सिद्धार्थचं झालं भांडण?, वाचा नेमकं काय झालं

फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलं का?; आज करतेय…