नवी दिल्ली | लॉककाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता देशातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. मात्र 15 तारखेला लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू होणार का? झाली तर ती कशी सुरू होणार? यासंबंधीचे प्रश्न आता चर्चिले जाऊ लागले आहेत.
लॉकडाऊन संपल्यानंतर सारवजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्र सरकारने एक विशेष योजना आखली आहे. त्यासंबंधीचा मसुदा देखील तयार झाला असल्याची माहिती कळत आहे. त्यानुसार रेल्वे आणि विमानवाहतूक करण्यासाठी सरकारने विशेष खबरदारी घेण्याचं ठरवलं आहे. काही मोजक्या आणि गरजेच्या ठिकाणी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसंच विमानतळावर थर्मल स्कॅनिंग देखील असणार आहे.
रेल्वे सुरू केली जाणार आहे पण ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रूग्ण आहे त्याच ठिकाणी रेल्वे धावणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त असेल त्या जिल्यात रेल्वे थांबणार नाही. तसंच बुकिंग करताना मीडल सीटचं बुकिंग देखील करता येणार नाही. काहीही कारण नसताना लोकांनी प्लॅटफॉर्मवर गर्दी करू नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट देखील महाग केलं जाणार आहे.
दुसरीकडे शाळा, महाविद्यालये, थिएटर शेवटच्या टप्प्यात म्हणजे कोरोनाचा धोका आटोक्यातआल्यानंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नसेल तिथे लोकांना ये जा करता येईल.
महत्वाच्या बातम्या-
-मोदी सरकारचं दुसरं आर्थिक पॅकेज; या क्षेत्रांना मिळणार मोठा दिलासा
-चालून थकलो आहे मला घ्यायला या… बीडच्या तरूणाचा वडिलांबरोबर अखेरचा संवाद अन्….
-ट्रम्प यांनी धमकी दिल्याबरोबर भारताने हायड्रोक्सीक्लोरिक्वीनवरची निर्यातबंदी उठवली
-14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
-… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी