ध.क्कादायक! ‘या’ कारणामुळे बबिता फोगाटच्या ‘बहिणी’ची आत्मह.त्या

नवी दिल्ली| क्रिडा विश्वातून एक ध.क्कादायक घटना समोर येत आहे. कुस्तीचा अंतिम सामना हरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू रितिकाने आत्मह.त्या केलीय. रितिका ही बबिता फोगाट, गीता फोगाटची मामेबहीण होती.

रितीका फोगाटने आत्मह.त्या केल्याच्या वृत्तामुळे कुस्ती क्षेत्रालाही मोठा ध.क्का बसला आहे. रितिका फक्त 17 वर्षांची होती. भारतपूर येथे बुधवारी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या पराभवामुळे खचल्यान रितिकाने आत्मह.त्या केली.

रितिकाने 12 ते 14 मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथील लोहागड स्टेडियमवर आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये रितिका एका सामन्यात पराभूत झाली. या पराभवानंतर तिला हा.दरा बसला आणि त्यानंतर 15 मार्च रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास बलाली गावच्या घरात पंख्याला स्कार्फ लावून आत्मह.त्या केल्याची माहिती आहे.

रितिकाने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंग फोगाट यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं. स्पर्धेदरम्यान तेदेखील उपस्थित होते. रितिका महावीर फोगाट स्पोर्ट्स अकॅडमीची विद्यार्थिनी असून या अकादमीमध्ये 5 वर्षांपासून प्रशिक्षण घेत होती.

53 किलो वजनी गटात राज्य पातळीवरील स्पर्धेत एका पॉईंटने झालेल्या पराभवाने रितिकाला मानसिक ध.क्का बसला, त्यामुळेच तिने हे ध.क्कादायक पाऊल उचलल्याची चर्चा आहे. यापूर्वी तिने सुमारे 4 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता.

रितिकाने पंखामध्ये स्कार्फ लावत स्वत: ला ग.ळफा.स लावला. मीडिया रिपोर्टनुसार पो.स्टमॉर्टमनंतर रितिकाचा मृ.तदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे, तर पो.लिस अद्याप या प्रकरणाचा त.पास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

सचिन वाझे प्रकरणात किरट सोमय्यांनी ठाकरे सरकारला दिला…

मराठी कलाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय जोडपं…

जाणून घ्या! दररोज बीट खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी…

महादेव जाणकरांचा बारामतीबद्दल पवारांना ईशारा, म्हणाले…

पॅराग्लायडींग करण्याचं धाडस केलं, पण चांगलंच अंगलट आलं;…