महाडनंतर आता मुंबईतील नागपाड्यात इमारतीचा भाग कोसळला; ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याची शक्यता

मुंबई | राजगड जिल्ह्यातील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना ताजी असताना मुंबईमध्ये नागपाड्यात आज दुपारी एका इमारतीचा काही भाग कोसळ्याची घटना घडली आहे.

नागपाडा परिसरातील ही घटना घडली आहे. एका दुमजली इमारतीचा काही भाग पडला असून त्याच्या ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकले असल्याची माहिती समजत आहे. संंबंधित इमारतीचं नाव मिश्रा असल्याचं समजंत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी मिश्रा इमरातीजवळ अग्निशामक दलाचे जवान आले असून त्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून बचावकार्य सुरु आहे. 3 जणं जखमी असून त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

अग्निशमन दलाच्या 5 गाड्या, पोलीस, रुग्णवाहिका आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा उपसण्याचं काम सुरू केलं आहे.

सध्या मुंबईमध्ये पावसाची उघडजाप सुरू असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. दुपारी  मोठी पावसाची सर आल्याने थोडा वेळ बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. मात्र पाऊस उघडल्यावर पुन्हा बचावकार्याला अगिनशामक दलाच्या जवानांनी सुरूवात केली.

या दुर्घटनेत आत्तापर्यंत समजू शकलेल्या माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मिश्रा ही इमारत जुनी आणि धोकादायक अवस्थेत असल्याचं समजंत आहे.

महाडमध्ये झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली होती. जवळजवळ 16 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. महाडमध्ये  एनडीआरएफच्या तीन पथकांकडून बचावकार्य सुरू होतं. यामध्ये चार वर्षाच्या मुलाला वाचवण्यात यश मिळालं होतं.

दरम्यान. सरकारने महाडमध्ये झालल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 50हजार रूपयांची मदत जाहीर केली होती.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! आलं केसांसाठी वरदान ठरू शकतं?; वाचा सविस्तर

सुशांतचं घर सोडण्याआधी रियानं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता?; सुशांतचा मित्र सिद्धार्थने केला धक्कादायक खुलासा

“राहुल गांधींचं कॉंग्रेस पक्षातील नेत्तृत्व मारायचे आणि कुजवायचे या षडयंत्रात पक्षातीलच घरभेदी सामील आहेत”

भारतीय कर्णधार किंग कोहलीने दिली गोड बातमी, विराटच्या घरी पहिल्यांदाच हलणार पाळणा!

खतरनाक! खोट्या ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर मी…; प्रवीण तरडे संतापले