Top news देश मनोरंजन

खूप दिवसांनंतर ढिंचाक पूजाचं नवं गाणं श्रोत्यांच्या भेटीला, लोकांनी केले कान बंद!

Photo Credit: You tube/ dhinchakpooja video

मुंबई | ढिंचाक पूजा ही सतत आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असते. ढिंचाक पूजाला नेटकरी स्वयंघोषित गायिका म्हणून ओळखतात. तिचं एखादं नवीन गाणं आलं आणि ती ट्रोल झाली नाही, असं घडलं तर नवलच. ढिंचाक पूजा सतत आपल्या गाण्यांमुळे ट्रोल होत असते.

अशातच आता खूप दिवसांनंतर ढिंचाक पूजाचं एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचं टायटल ‘जाऊ में प्लेन में’ असं आहे. बुधवारी पूजाचं हे नवीन गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

या गाण्याच्या व्हिडीओमध्ये पूजा विमानात बसून गाणं गाताना दिसत आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी पूजाचं हे गाणं पाहिलं आहे. परंतु तिच्या या गाण्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. या गाण्यानंतर लोकांनी आपले कान बंद केल्याचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर हे गाणं ऐकल्यानंतर म्हणाला की, माझी आता जिवनात दुसरी कोणतीच इच्छा राहिली नाही. तर दुसरा एक युजर गाणं ऐकल्यानंतर म्हणाला की, माझी आता कोणतंच गाणं ऐकण्याची इच्छा नाही.

ढिंचाक पूजाने 14 सप्टेंबर रोजी आपल्या गाण्याच्या रिलीज डेटविषयी ट्वीटरवरून माहिती दिली होती. 15 सप्टेंबर रोजी रिलीज होणारं माझं ‘जाऊ में प्लेन में’ हे गाणं न विसरता ऐका, असं पूजाने म्हटलं होतं.

ढिंचाक पूजाच्या या ट्वीटनंतरच सोशल मीडियावर तिच्या या गाण्यावर मीम्स व्हायरल होण्यास सुरुवात झाली होती. आपल्या गाण्यांमुळे कितीही ट्रोल झाली तरी देखील पूजा अनेक नवनवीन गाणी गात असते.

महत्वाच्या बातम्या-

खुशखबर! आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर

फराह खानने सलमान खान बद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली…

पती राज कुंद्रासाठी शिल्पाचा अनोखा नवस, घोड्यावर बसून देवीच्या दर्शनाला

…म्हणून भर ऑफिसमध्ये बहिणीनेच बहिणीला धो धो धुतलं, पाहा व्हिडीओ

वर्षभर सेक्स न करताही गर्भवती राहिली तरुणी? पोटदुखीमागे डॉक्टरांनी सांगितलं गजब कारण