आशा कधीही सोडायची नाही…; सामन्यानंतर मराठमोळ्या शार्दूल ठाकूरची प्रतिक्रिया

मुंबई |  भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या चौथ्या टी ट्वेन्टी सामन्यात पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात देखील भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. आजच्या सामन्यात न्यूझीलंडला शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची गरज असताना शार्दुल ठाकूरने शेवटचे दोन चेंडू स्लोवर वन टाकत सामना सुपर ओव्हरपर्यंत घेऊन गेला आणि त्याने मॅच देखील टाय करून दिली. भारताने सामना जिंकल्यानंतर त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

शेवटपर्यंत आशा कधीच सोडायची नसते. मी देखील आजच्या मॅचमध्ये शेवटपर्यंत आशा सोडली नव्हती. शेवटी मॅच बरोबरतीत सुटली आणि सुपर ओव्हर होऊन अंतिमत: भारतीय संघ सामना जिंकला, असं शार्दूल म्हणाला.

या सामन्यानंतर आशा सोडायची नसते हा माझ्यासाठी मोठा धडा आहे. अखेरच्या चेंडूंवर मिळालेला बळी हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. याच विकेटनंतर न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला, असंही शार्दूल म्हणाला.

दरम्यान, भारताने सलग चौथा सामना जिंकत सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे. शेवटच्या सामन्याकडे सगळ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘सुपर ओव्हर’ला त्रासून न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांची अजब मागणी! म्हणाले…..

-हिटलरने जर्मनीत केलं तोच प्रकार भारतात घडवण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा मोदी-शहांवर आरोप

-अरविंद केजरीवालांनी घातलीये भाजप समर्थकांच्या काळजाला साद; व्हीडिओ नक्की बघा…

-छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार- फडणवीस