नवी दिल्ली | लॉकडाऊन केल्यानंतरही देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयश येत असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
7 मेनंतर काय आणि कशी वाटचाल असणार? 17 मेनंतर लॉकडाऊनबाबत मोदी सरकारची काय रणनीती आहे? असे प्रश्न सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले आहेत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना आणि लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
कोरोनाचा सामना करत असताना वयस्कर, मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींची काळजी घेणंही गरजेचं आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. तर माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यांच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून चंद्रकांत पाटलांचा लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला विरोध
-धक्कादायक! एका दिवसात 38 पोलिसांना कोरोनाची लागण
-आणखी बळी जातील पण अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प
-महाराष्ट्रातली परिस्थिती चिंतेची, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- केंद्रिय आरोग्यमंत्री
-शाहू राजांचा फडणवीसांकडून कार्यकर्ता म्हणून उल्लेख; ट्रोल झाल्यावर पोस्ट केली डिलीट