MPSC निकालात मराठा समाजातील मुलांची संख्या बघून समाधान आणि आनंद वाटला- छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर | नुकताच राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. या निकालामध्ये मराठा समाजातील मुला-मुलांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. ग्रामीण तसंच शहरी भागातील मराठा समाजातील मुलांना अनेक मोठ-मोठी पदं मिळाली आहेत. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत त्यांचं अभिनंदन केलं आहे तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी लढा देणं का गरजेचं होतं? हे निकालावरून सिद्ध झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट-

“MPSC परीक्षेतुन निवड झालेल्या सर्व भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन. मराठा समाजातील मुलांची संख्या बघून समाधान वाटलं. अरक्षणासाठीचा लढा उभारणं का गरजेचं होतं, हे कालच्या निकालाने सिद्ध झालं.”

“माझे सर्व समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांना आवाहन आहे, की येणाऱ्या काळात महाराष्ट्रापुढे अभूतपूर्व आव्हाने उभे राहतील, त्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देण्याकरिता प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही स्वतः सिद्ध व्हाल, आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षात सर्वोच्च योगदान द्याल ही अपेक्षा”

 

 

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ कारणाने सुशांतला ते ३ सिनेमे करता आले नाहीत, पोलिसांचा वेगात तपास सुरु

-जागतिक आरोग्य संघटनेचा दिलाय हा इशारा; जग आता मोठ्या संकटात!

-3 वर्षे कॉलिंगसाठी साधा मोबाईल वापरला; अडीच वर्षात क्रॅक केल्या 4 स्पर्धा परीक्षा!

-वारीच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसंदर्भात राज्य सरकारची मोठी घोषणा

-…तर कोरोनाचा उद्रेक अटळ, तुकाराम मुंढे यांचा गंभीर इशारा