“आरएसएसवर बंदी घाला” या काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले,

नवी दिल्ली | हिंदुत्वावादी संघटना (Right Wing) म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घाला अशी मागणी काँग्रेसचे खासदार के. सुरेश (K. Suresh) यांनी केली होती.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर भारत सरकारने कारवाई केली आहे. पीएफआय Popular Front of India आणि तिच्याशी संबंधीत आणि संलग्न अनेक संस्थांवर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घातली गेली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील बंदी घालण्याची मागणी केली आहे. या मागणीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फजणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाष्य केले आहे.

असे मुर्खांसारखे बोलणारे लोक अनेक आहेत. या देशात कायदा आणि संविधान अस्तित्वात आहे. कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्यासाठी पुरावे लागतात, अशी संतप्त प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

भाजपशासित किंवा इतर राज्यांमध्ये आरएसएसने पीएफआयप्रमाणे कारवाया आणि कृत्ये केल्याचे ते शोधू शकले का? असा संतप्त सवाल फडणवीसांना के. सुरेश यांना केला आहे.

आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी पूर्वीच्या काँग्रेस आणि कम्युनिस्ट सरकारने देखील केली होती, अशी आठवण मुंबईत माध्यामांसोबत बोलताना फडणवीस यांनी करुन दिली.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि खासदार दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी पीएफआयवर सुरु असलेल्या कारवाईवर भाष्य केले होते. त्यांनी त्यावेळी आरएसएसवर निशाणा साधला होता.

‘एक ही थाली के चट्टे-बट्टे’, असे म्हणत त्यांनी आरएसएसची तुलना पीएफआयसोबत केली होती. द्वेष आणि हिंसाचार पसरविणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, असे सिंह म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या –

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कारवाईवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मग घ्या ना धौती योग!’ म्हणत आशिष शेलारांचे शिवसेनेला पत्र; वाचा सविस्तर पत्र

टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात

‘पीएफआय’बाबत किरीट सोमय्यांचा मोठा दावा; म्हणाले, या संघटनांना निधी…

‘शिवभोजनथाळी’बाबत मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय