राज ठाकरेंच्या भाषणानंतर शरद पवारांना सतावते ‘ही’ चिंता, म्हणाले…

 जळगाव | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार वादविवाद रंगताना दिसत आहे. त्यामुळे राजकारणाची पातळी देखील खालावल्याचं दिसतंय.

अशातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्याच्या राजकारणावर चिंता व्यक्त केली आहे. जळगावमध्ये त्यांनी आज पत्रकार परिषद घेत राजकीय विषयांवर मत व्यक्त केलं.

एखादा राजकारणी टोकाची भूमिका घेऊन जात असेल त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन द्यावं ही भूमिका घेतली तर ती काळजी करण्यासारखं आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

या सगळ्या कार्यक्रमामुळे समाजात सामाजिक ऐक्य संकटात येईल की काय?, अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

काही झालं तरी महाराष्ट्र एकसंघ राहिलाच पाहिजे आणि सर्व धर्म जाती भाषा यांच्यात सामंज्यस असलं पाहिजे, असं परखड मत देखील शरद पवार यांनी यावेळी मांडलं आहे.

राज ठाकरे यांचं भाषण ऐकल्यानंतर असं वाटतंय की त्यांना हिंदूत्वाच्या दिशेने त्या रस्त्यावर जायचंय, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, प्रत्येक राजकीय पक्ष आपला कार्यक्रम आपली दिशा ठरवतं. त्यांना अधिकार आहे त्यांनी ठरवलं, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं, म्हणाले “शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”

“एकेकाळी माझे पाय धरायचे, ते आता माझ्याविरोधात आणि पवारांवर बोलतात

‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी 

संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ 

“मोदींच्या नावावर मतं मागून शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले”