‘संजय राऊतांनंतर आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा नंबर’, रवी राणांच्या दाव्यामुळे खळबळ

मुंबई | पत्राचाळ बांधकामात आर्थिक घोटाळा आणि पैशांच्या अफरातफरी प्रकरणी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) म्हणजे ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

त्यांच्या अटकेनंतर आता शिवसेना राज्यात आक्रमक झाली असून त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे. तसेच मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी याविरोधात कायदेशीर लढाई देणार असल्याचे सांगितले आहे.

संजय राऊतांच्या अटकेनंतर विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करत आहेत. अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवर भाष्य केले आहे.

राणा म्हणाले, गेल्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करत असून संजय राऊतांना वेळोवेळी चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. पण राऊतांनी वेळोवेळी टाळाटाळ केली. राऊतांनी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत आणि त्याचे धागेदोरे लांबपर्यंत म्हणजे अगदी अनिल परबांपर्यंत जात आहेत.

संजय राऊतांनंतर आता अनिल परबांचा (Anil Parab) नंबर लागणार आहे. अनिल परबांना देखील जेलमध्ये जावे लागेल. महाविकास आघाडी सरकार (MVA) स्थापनेत राऊतांचा पुढाकार होता. त्यांनी भाजपला बाजूला सारत काँग्रेस (INC) आणि राष्ट्रवादीला (NCP) जवळ केले, असे राणा म्हणाले.

राऊत जेलमध्ये गेले आता महाविकास आघाडी सरकारच्या एकएकाचा नंबर लागेल. त्यामुळे आता राऊतांनंतर अनिल परब देखील जेलमध्ये जाणार आहेत, असा दावा राणा यांनी केला.

संजय राऊत यांची ईडीकडून रविवारी (दि. 31 जुलै) रोजी रात्री उशिरापर्यंत चौकशी झाली. त्यांना चौकशीअंती ईडीने ताब्यात घेतले. रात्री उशिरा 12 वाजता त्यांना अटक केल्याचे सक्तवसुली संचलनालयाने जाहीर केले.

महत्वाच्या बातम्या –

संजय राऊतांच्या अटकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

‘हे काही शहाणपणाचं नाही’, राज्यपालांविरोधात शरद पवार आक्रमक

‘दरवेळी उपलब्ध असलेले फडणवीस आता कुठे गेले?’, सुप्रिया सुळेंची टोलेबाजी

राज्यापालांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रकाश आंबेडकरांचं समर्थन, म्हणाले…