मोठी बातमी! शरद पवारांपाठोपाठ अजित पवारांनाही धक्का

मुंबई | विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. मात्र आता हे अध्यक्षपद त्यांना सोडावं लागणार आहे. यामुळे आणखी एका संघटनेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे.

अजित पवार हे 2013 – 2017 आणि 2017 पासून आतापर्यंत या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. हे अध्यक्षपद सोडल्यानंतर अजित पवार यांना स्पोर्ट्स कोडनुसार पुढील 5 वर्ष एमओएमध्ये रेड कार्ड असेल. त्यामुळे त्यांना पाच वर्ष सदस्य वगळता इतर पदांवर संधी नसणार आहे .

एखाद्या व्यक्तीला दोन टर्म किंवा आठ वर्षांपेक्षा जास्त काळ संघटेनवर राहता येणार नाही, असा नियम याच आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे हंगामी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी 11 जुलैला या संदर्भातील परिपत्रक काढलं.

या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसारच आता मराहाष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला आपल्या घटनेमध्ये बदल करावा लागणार आहे.

यातील नियमांनुसार आता अजित पवारांना ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी! 

‘तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?’, अमृता फडणवीस म्हणतात… 

‘गुजरात दंगलीतून नरेंद मोदींना…’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

“अखेर नड्डा देखील सब घोडे बारा टक्के निघाले”

भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते होणार- नितीन गडकरी