सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजच्या वडिलांनी मुलीसाठी उचललं मोठं पाऊल!

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अचानक झालेले निधन हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता. सिद्धार्थच्या अकाली झालेल्या मृत्यूनंतर मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली होती. अनेक बड्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थला श्रद्धांजली वाहताना त्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याची जवळची मैत्रिण अभिनेत्री शेहनाज गीलची अवस्था खूप वाईट झाली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख शेहनाजसाठी असहय्य झालं आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाजची प्रकृती देखील बिघडली होती.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर काही दिवस शेहनाज नीट खातपीत नसल्याने ती फक्त ग्लुकोजवर होती. यामुळे सर्वांनाच तिची चिंता वाटू लागली होती. या दु:खातून सावरण्यासाठी शेहनाजला बळ मिळावे म्हणून अनेक बडे कलाकार देखील प्रार्थना करत आहेत.

शेहनाजला या दु:खातून बाहेर काढण्यासाठी शेहनाजचे कुटुंब देखील प्रयत्न करत आहे. आपली मुलगी या धक्यातून बाहेर निघावी म्हणून शेहनाजचे वडील संतोष गील यांनी आपल्या हातावर एक टॅटू कोरला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेहनाजच्या एका फॅनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये शेहनाजचे वडील टॅटू दाखवताना दिसत आहेत. शेहनाजच्या वडिलांनी काढलेल्या टॅटूमध्ये नमस्कार केलेले हात आणि त्याखाली शेहनाजचं नाव दिसत आहे. तसेच शेहनाजच्या नावाच्या बाजूने गुलाबाची फुले देखील दिसत आहेत.

दरम्यान, शेहनाज आणि सिद्धार्थ दोघे बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते. बिग बॉस मधील शेहनाज आणि सिद्धार्थची मैत्री सर्वांनाच खूप आवडली. शोदरम्यान या दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाले, मतभेद झाले, तरी देखील हे दोघे नेहमी एकमेकांच्या जवळ राहिले. त्यामुळे ही जोडी सर्वांची फेवरेट राहिली.

या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी सिदनाज असं नाव दिलं होतं. या दोघांचं बॉन्डिंग केव्हा केव्हा प्रेक्षकांच्या देखील डोळ्यात अश्रू आणणारं ठरलं. मात्र, आता ही सिदनाजची जोडी आपल्याला केव्हाच एकत्र पाहायला मिळणर नाही.

महत्वाच्या बातम्या-

“मामा-मामी माझ्या आईवडिलांसारखे आहेत, मी त्यांची माफी मागतो”

नवरदेवानं असं काही केलं ते पाहून नवरीला बसला धक्का, पाहा व्हिडीओ

पर्यटकांच्या गाडीवर थेट चढला चित्ता अन्…पाहा व्हिडीओ

धक्कादायक! दाढी करताना वस्तारा लागला तरूणाच्या गळ्याला अन्…, पाहा व्हिडीओ

काय सांगता! स्वत:च्याच लग्नात नवरी गेली झोपी अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ