मुंबई | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईच्या यादीत आता संजय राऊतांचा देखील नंबर लागला आहे. आज ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर संपत्ती जप्तीची कारवाई केली आहे.
संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. या कारवाईमुळे संजय राऊत यांना मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय.
ईडीने अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे आता शिवसेना अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
1 हजार 48 कोटींचा घोटाळा ही कारवाईची सुरुवात असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दोन महिन्यापासून राऊत यांनी ज्या पद्धतीने आरोप केले ही त्यांची मानसिक अवस्था मी समजू शकतो, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.
राज्यातील पोलिसांचा माफियासारखा वापर करून तोंड बंद करण्याचा प्रयत्न होतोय, पण कितीही दबाव टाका, आम्हाला फरक पडत नाही, असंही सोमय्या म्हणाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यायला हवी, असंही सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज