मुंबई | कॉर्डिलिया क्रुझवर एनसीबीनं मोठा छापा टाकत अनेकांना ताब्यात घेतलं होतं. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी या कारवाईचं नेतृत्व केलं होतं.
कॉर्डिलिया क्रुझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि समीर वानखेडे दोघेही चर्चेत आले होते.
या प्रकरणानं संपूर्ण देशभर गदारोळ घातलेला पहायला मिळाला. अशातच याप्रकरणी आर्यन खानला क्लिनचिट देण्यात आली आहे.
एकीकडे आर्यनला दिलासा देण्यात आला असतानाच दुसरीकडे आर्यनला या प्रकरणामध्ये अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे अडचणीत सापडले आहेत.
मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली आता चैन्नईला करण्यात आल्याचं समजतंय.
केंद्र सरकारने आज काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये समीर वानखेडेंचंही नाव आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Petrol Diesel संदर्भात महत्त्वाची बातमी, पेट्रोल पंप चालकांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी
मोठी बातमी ! नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ, समोर आली ‘ही’ माहिती
“आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही”
कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!