वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणतात, “भीक नहीं अधिकार चाहिये…”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) स्थगिती दिली होती. त्यामुळे मागील काही महिन्यांंपासून ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून राजकारण तापल्याचं पहायला मिळतंय.

भाजपने ओबीसी आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली असल्याने आता महाविकास आघाडीचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्या वक्तव्यावर चांगलाच वाद रंगला आहे.

ज्यावेळी लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यावरून आता राजकारण चांगलंच पेटलं आहे.

आव्हाडांच्या या वक्तव्यावर आता भाजपने आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते देखील आता आव्हाडांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रातला ‘ओबीसी जागा हो… राष्ट्रक्रांतीचा धागा हो…’, अशी घोषणा जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे.

हमे भीख नहीं अधिकार चाहिये, असंही आव्हाडांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्याचसोबत त्यांनी जय भीम म्हणत वाद शमवण्याचा प्रयत्न केलाय.

दरम्यान, त्यांनी ट्विट करताना #मंडल_विरुद्ध_कमंडल असा हॅशटॅग वापरला आहे. या हॅशटॅगवरून त्यांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

नव्वदीच्या दशकात देशाच्या राजकारणात मोठे बदल झाले होते. याच दशकात काँग्रेस घराण्याव्यतिरिक्त अन्य सरकारे सत्तेत येऊ लागली. या काळात मंडल आयोग नेमला गेला होता.

दरम्यान, 1990 साली मंडल आयोगाने मांडलेल्या शिफारसीवर भाजपने विरोध केला होता, याच मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी भाजपवर टीका केली आहे.

पाहा ट्विट-


महत्वाच्या बातम्या –

लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचा ताजा भाव

मुंबई लाॅकडाऊनच्या दिशेने! आजची धडकी भरवणारी कोरोना आकडेवारी समोर

पुण्यात उद्यापासून नवे निर्बंध! अजित पवार म्हणतात, “नियम पाळा नाहीतर…”

 …अन् जितेंद्र आव्हाड भाजप आमदाराला म्हणाले, “साॅरी, साॅरी, साॅरी, साॅरी”

 पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य