CDS बिपीन रावतांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय!

नवी दिल्ली | चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Ravat) यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाहीत.

पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना कोणत्याही प्रकारच्या सेलिब्रेशनपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. सोनिया गांधी गुरुवारी 75 वर्षांच्या होणार आहेत. आदरणीय काँग्रेस अध्यक्षांनी 9 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ट्विट के सी वेणुगोपाल यांनी केलं आहे.

तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाने आपला पहिला सीडीएस गमावला आहे. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यासोबत आणखी 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात त्यांच्या पत्नी मधुलिका यांचाही समावेश आहे.

संपूर्ण देशात सध्या शोकाकूल वातावरण आहे. देशाने बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 अधिकाऱ्यांना कायमचं गमावलं आहे. पंतप्रधान राष्ट्रपतींसह, सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

काही तासांपूर्वीच सीडीएस बिपीन रावत यांची निधनवार्ता सैन्याने कळवली आहे. अपघातनंतर तामिळनाडूतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यानंतर उद्या त्यांचं पार्थिव तामिळनाडूतून दिल्लीत आणलं जाणर आहे. राजधानी दिल्लीतही आता शोकाकूल वातावरण आहे.

सीडीएस बिपीन रावत यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य सैन्यासाठी आणि देशसेवेसाठी अर्पण केले. त्यांच्या नावावर अनेक धाडसी पराक्रम आहेत. सर्जिकल स्ट्राईकच्या प्लॅनिंगमध्येही त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. सीडीएस बिपीन रावत कारगील युद्धातही सहभागी झाले होते. त्यांचं देशासाठीचे अनमोल योगदान देश आणि भारतीय सैन्य कधीही विसरू शकणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

CDS बिपिन रावतच नाही तर ‘या’ दिग्गजांनीही विमान अपघातात गमवालाय आपला जीव 

लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचं दुर्दैवी निधन! 

बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; शक्तिकांत दास यांनी केली ‘ही’ घोषणा 

“शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही” 

‘हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ