मुंबई | महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येतय. आता शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात झाल्याचं दिसत आहे.
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापलं बघावं अशी भूमिका शिवसेनेने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेने ही भूमिका घेतल्यास त्याचा परिणाम येत्या विधानपरिषद निवडणुकीत नक्कीच पहायला मिळेल. शिवसेनेच्या भूमिकेमुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दुसरा उमेदवार निवडून येण्यास अडचणी निर्माण होणार आहेत.
दुसरीकडे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे अपक्ष आमदार नाराज झाले आहेत. देवेंद्र भुयार यांनी म्हटलं, शिवसेनेचं नियोजन चुकलेलं आहे.
मला एक सुद्धा फोन शिवसेनेकडून आला नाही तरी मी त्यांना मतदान केलं आहे. आम्ही शरद पवारांची भेट घेणार आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकूण चार उमेदवार रिंगणात होते. तर भाजपचे तीन उमेदवार रिंगणात होते. सहा जागांसाठी सात उमेदवार असल्याने ही निवडणूक झाली आणि त्यात शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
“असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, हे आम्ही आमचं दुर्दैव समजतो”
‘मी वाचवू शकलो नाही’ म्हणत त्याने लेकीचा जळालेला पाय पोलिसांकडे नेला; काळीज पिळवटून टाकणारी घटना
“…तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील”
“एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल पण शरद पवारांच्या मनात काय हे कळणार नाही”
देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट!