Top news खेळ देश

पंजाबचा दारुण पराभव केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं केला मोठा खुलासा म्हणाला…

मुंबई | आयपीएल 2020 मधील 18वा सामना काल चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज XI पंजाब यांच्यामध्ये खेळला गेला. पंजाबच्या संघावर मात करत चेन्नईनं या सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. आंयपीएल मधील टॉपचा संघ मानल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची गेल्या काही सामन्यांमध्ये खेळी चांगली राहिली नव्हती. यामुळे या सामन्यावर सर्वांच लक्ष लागून होतं.

कालचा हा सामना दुबईमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात चेन्नईनं 10 गडी राखत पंजाबवर विजय मिळवला आहे. या सामन्यात पंजाबच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पंजाबच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 178 धावांचा डोंगर चेन्नईपुढे उभा केला होता.

यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या फॅफनं 53 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार मारत 87 धावांची नाबाद खेळी साकारली. तसेच वॉटसननंही 53 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकार मारत नाबाद 83 धावा केला. फॅफ आणि वॉटसन यांनी पंजाबच्या गोलंदाजी विरुध्द जोरदार खेळी खेळली आणि चेन्नई संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चेन्नई संघाला जोरदार यश मिळाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी चांगलाच खुश दिसत होता, संघाला विजय मिळाल्यानंतर धोनीनं माध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त करत काही खुलासे केले आहेत.

मी सुरुवातीचे 3-4 सामने पहिले. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की समोरच्या संघाला कमी स्कोरवर थांबवून त्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो. प्रत्येक संघात असे खेळाडू आहेत जे समोरच्या गोलंदाजावर दबाव आणू शकतात पण आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, असा खुलासा धोनीनं केला आहे.

तसेच मला वाटतं आम्ही छोट्या छोट्या गोष्टी दुरुस्त केल्या हे आमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं होतं. आमच्या संघाला ओपनिंगला ज्या प्रकारच्या जोडीची गरज होती ती आज संघाला मिळाली. आशा आहे की येणाऱ्या सामन्यात सुद्धा याची पुनरावृत्ती होईल, असं महेंद्रसिंग धोनीनं म्हटलं आहे.

फॅफ आणि वॉटसन यांच्या खेळी विषयी सुद्धा धोनीनं आपलं मत व्यक्त केलं आहे. इथे गोष्ट जास्त आक्रमक होण्याची नाहीये. फॅफ आणि वॉटसन हे दोघेजण नेट प्रक्टिसमध्ये खूप चांगल्या प्रकारे हिट करत होते. हीच गोष्ट त्यांनी प्रत्यक्ष मॅचमध्ये खेळताना सुद्धा केली, असाही खुलासा धोनीनं केला आहे.

तसेच हि फक्त वेळेची गोष्ट आहे. फॅफ आमच्यासाठी एका अँकरप्रमाणे आहे. तो मध्ये मध्ये आपले जोरदार शॉट्स मारत असतो, असंही धोनीनं म्हटलं आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज हा संघ आयपीएल 2020 मध्ये दोन विजय आणि 3 पराभवांसह टेबलमध्ये सहाव्या क्रमाकांवर आला आहे. चेन्नईचा पुढचा सामना 7 ऑक्टोबरला कोलकत्ता नाईट राईडर्स विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गंदी बात वेबसीरिजच्या पाचव्या भागाचा इन्टिमेंट सीन शुट करतानाचा व्हिडीओ व्हायरल

अखेर नेहा कक्करचं ठरलं; या व्यक्तीसोबत लग्न करणार?

“सुशांतला धमकावत त्याच्यावर बला.त्काराचे आरोप केले जात होते”

पहिल्या महिंद्रा थारची बोली पोहोचली 1.10 कोटीवर; का लावत आहेत लोक एवढी बोली?

‘टॉप’वर पोहचण्यासाठी अनेक हिरोईननी केलं ‘हे’ काम; ईशा कोप्पिकरचा धक्कादायक खुलासा