महाराष्ट्र मुंबई

कलम 370च्या निर्णयानंतर आता बेळगाव महाराष्ट्राला द्या- नितेश राणे

मुंबई : मोदी सरकारने काश्मीरबाबत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर विरोधकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मोदींच्या निर्णयाचं कोणी स्वागत केलं तर कोणी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी काश्मीरनंतर आता बेळगाव प्रश्नही निकाली काढण्याची मागणी केली आहे.

काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णययानंतर…बेळगाव महाराष्ट्राला देण्याची दिर्घकालीन प्रलंबित मागणी का पूर्ण होऊ नये! बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग आहे! अखंड महाराष्ट्र!, अशी मागणी नितेश राणेंनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेल्या बेळगावला महाराष्ट्रात घेण्यासाठी गेली 50 वर्षापासून लढा सुरु आहे.

खरं तर काँग्रेसने हा काश्मीरी जनतेशी केलेला दगा आहे असं सांगत प्रस्तावाला विरोध केला. नितेश राणेंनी अप्रत्यक्षपणे मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दिला असल्याचं दिसतंय.  

  

महत्वाच्या बातम्या-

-अमित शहा भडकले; म्हणाले…त्यासाठी जीवही देऊ

-संभाजी ब्रिगेड आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चं काम करणार!

-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’स सुरुवात

-“सचिन पायलट किंवा ज्योतिरादित्यांना काँग्रेसचे अध्यक्ष करा”

-“जम्मू काश्मीरचा करार पंडित नेहरुंनी केला, सरदार पटेलांनी नाही”

IMPIMP