मोदी सरकारने बजेट मांडल्यानंतर या’ वस्तू होणार स्वस्त…. तर ‘या’ वस्तू महागणार!

नवी दिल्ली |  केंद्रातील नरेंद्र मोदी 2.0 सरकारने येत्या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. काही वस्तूंवर आयात करात वाढ केल्यामुळे पुढील वर्षभरात ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत तर काही वस्तू स्वस्त देखील होणार आहेत.

या वस्तू महागणार-

टेबल फॅन, सिलिंग फॅन, पोर्टेबल ब्लोवर्स, वॉटर हिटर, हेअर डायर, इलेक्ट्रिक इस्त्री, टेबल वेअर, किचन वेअर, ग्लासवेअर, चप्पल, शेवर्स, हेअर क्लिप, हेअर रिमूव्हींग वस्तू, कॉफी आणि टी मेकर्स, खेळणी स्टेशनरी, कृत्रिम फुले, ट्रॉफी, सिगारेट, हुक्का, जर्दा, तंबाखू, बटर ऑईल, बटर घी, पीनट बटर, शीतगृहातील बटाटे, आक्रोड

या वस्तू स्वस्त होणार-

मायक्रोफोन, ई-वाहने, वृत्तपत्रांचा कागद, क्रीडासाहित्य

दुसरीकडे मोदी सरकारच्या पाठीमागच्या 6 अर्थसंकल्पाच्या दिवसांपैकी 4 अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात घसरण होती. तरीदेखील गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सेन्सेक्स 0.6% टक्के वाढला होता. अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या बजेटने गुंतवणूकदारांना निराश केलं. आजच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी विशेष करून गुंतवणूकदारांना चांगलाच झटका बसला. शनिवारी (आज) गुंतवणूकदारांचं 3.6 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-आजच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही- अशोक चव्हाण

-मोदींचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रवार अन्याय- उद्धव ठाकरे

-आजचं बजेट एका वर्षाची दिशा देऊ शकत नाही तर दशकाची दिशा काय देणार?? जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

-अर्थमंत्र्यांचं 162 मिनिटांचं भाषण… गुंतवणूकदारांच्या 3. 6 लाख कोटी रूपयांना झटका!

-मोठमोठे आकडे दाखवून दिशाभूल करण्याच्या प्रयत्न; अर्थसंकल्पावर जलीलांची टीका