अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई-बुब्स-ब्रा’ पोस्टनंतर आता ‘लिंबाच्या शक्ती’ची पोस्ट चर्चेत!

मुंबई | अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिच्या फॅन्ससोबत संवाद साधत असते.

काही दिवसांपूर्वी तिची बाई बुब्स आणि ब्रा ही पोस्ट तुफान चर्चेत होती. हेमांगीच्या एका व्हिडीओवरून हा वाद रंगला असताना तिने ती पोस्ट लिहिली होती.

हेमांगीनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र नेटकऱ्यांनी हेमांगीला अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करण्यात आलं. मात्र यावर हेमांगीनं पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलं होतं.

त्याला हजारो लोकांनी प्रतिसाद दिले होते. त्यानंतर आता हेमांगीची आणखी एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. इंधनदरवाढीवरून हेमांगीने ही पोस्ट लिहीली आहे.

ह्या petrol दरवाढी वर लिंबू फिरवायचा होता मला पण आता लिंबू वर petrol फिरवणार आहे! , असं म्हणत हेमांगीने पेट्रोलच्या दरवाढीवर मजेशीर पोस्ट केली आहे. #कसंजगायचं #कसंचालायचं #कुणीसांगेलकामला , असं टॅग्स देखील तिने वापरले आहेत.

हेमांगीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी देखील मजेशीर पोस्ट केल्या आहेत. काहींनी तिला घराबाहेर लिंबाचं झाड लावण्याचा सल्ला दिलाय तर काहींनी काळी बाहुली बांधा ,लिंबू, मिरची बांधा गाडीला पेट्रोल कमी होईल, असं कमेंटमध्ये लिहिलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…हे असलं काही चालणार नाही”; सुशीलकुमार शिंदेंनी राज ठाकरेंना फटकारलं

“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत?”

शरद पवारांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले… 

“कायद्यापासून पळू नका सांगणारे आता *** पाय लावून पळतायेत” 

Raj Thackeray | “जरा मोकळं बोलले तर इतकी हवा, मनमोकळं बोलले तर मग एकदम धुव्वा”