नोएडातील ट्विन टॉवर पाडण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दणका

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार इमारत कायद्यात अडथळा ठरणारे आणि अनधिकृत सिद्ध झालेले दिल्लीजवळील नोएडा (Noida) शहरातील ट्विन टॉवर (Twin Towers) जमिनदोस्त करण्यात आले.

त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत देखील तशा स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मुंबईतील अनिधिकृत टॉवर्संचा मुद्दा उपस्थित केला.

सोमय्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्रे लिहुन मुंबईतील अनधिकृत टॉवर्सवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच मुंबईतील बांधकाम व्यावसायीक आणि महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी यांचे विशेष ऑडीट (Special Audit) करण्याची देखील मागणी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबईत भोगवाटा प्रमाणपत्र (OC) न मिळालेले शेकडो टॉवर्स आहेत. या ठिकाणी पाच ते दहा वर्षांपासून मध्यमवर्गी राहत आहेत. व्यावसायिकांनी (Builders) या ठिकाणी अनधिकृत मजले बांधले आहेत, असे यावेळी सोमय्या म्हणाले.

माझ्या माहितीप्रमाणे, मुंबई शहरात 25 हजारांहून जास्त फ्लॅटधारक भोगवाटा प्रमाणपत्र न मिळाल्याच्या चिंतेत आहेत. त्या बांधकाम व्यावसायीक आणि महापालिका अधिकाऱ्यांवर विशेष ऑडीट करण्याची मागणी सोमय्या यांनी केली.

यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा देखील उल्लेख केला. सरनाईकांवर विहंग इमारतीसंबंधी आरोप करण्यात आले होते. सोमय्या म्हणाले, मी त्या इमारतीबद्दल विषय काढल्यावर महापालिकेने विहंगच्या रहिवाश्यांना ओसी दिली.

महत्वाच्या बातम्या –

सत्ताधाऱ्यांना शरद पवारांची संगत का नको? जाणून घ्या कारणे

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल; अमोल मिटकरी यांचे खळबळजनक भाकीत

गणेश भक्तांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांनी दिले नवे आदेश

“आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे!” – मनसेचे संदीप देशपांडे

वैज्ञानिकांना लागला दुसऱ्या पृथ्वीचा शोध?