वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्तांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे | फेब्रुवारी महिन्यापासूून राज्यात कोरोनाने पुन्हा डोक वर काढायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसरकारने 28 फेब्रुवारी पर्यंत संचारबंदी केली असून सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे हे नियम पाळणं बंधनकारक केली आहेत. अशातच वाढत्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पुणे महापालिकेनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी तसेच त्यांना उपचारादरम्यान त्यांना बेड मिळावे, यासाठी पुणे महापालिकेने पुन्हा कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. विक्रम कुमार आणि खासगी रुग्णालय प्रमुखांशी एक बैठक पार पडली. त्यावेळी पालिका आयुक्तांनी शहरातील रुग्णालयाना सूचना दिल्या आहेत.

खासगी रुग्णालयातील बेडची माहिती डॅशबोर्डवर अपडेट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयाने कोरोना रुग्णाचा उपचार करण्यास नकार दिला किंवा त्याचा प्रवेश नाकारला तर त्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार असल्याचंही विक्रम कुमार यांनी सांगितलं. त्यामुळे कोणत्याही कोरोना रुग्णाला खासगी रुग्णालय नाकारु शकत नाही आणि त्याच धाडस खासगी रुग्णालयांनी करु नये, असंही विक्रम कुमार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

आता कुठे सर्व सुरळीत सुरु असतातना पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याप्रमाणेच मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सर्वसामान्य लोकांच्या प्रवासासाठी लोकल सुरु करुन जवळजवळ तीन आठवडे झाले आहेत.

वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिकेकडूनही विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसेच लोकल सेवा सुरु झाल्यापासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढ होताना दिसत आहे, असं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

मंगळवारी 22 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी संपूर्ण राज्यातील कोरोनाचा आढावा घेतला.

दरम्यान, 1 मार्चपासून केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरीकांसाठी कोरोनाचे लसीकरण सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांना लसीकरण सुरु होणार हे दिलासादायक आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाचा राजीनामा घेणाार”

भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार डेलकर यांची आत्मह.त्या?

जाणून घ्या! काजू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला आता नरेंद्र मोदींचं नाव! सोशल मीडियावर चर्चांना उधान

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बाथटबमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा फोटो