मुंबई | गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसतं आहे.
याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे.
एवढे निर्बंध घालून देखील राज्यातील कोरोनाची परिस्थीती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ठाकरे सरकारेने कर्मचारी वर्गाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने राज्यातील सर्व खासगी कार्यालये व अस्थपनामध्ये आरोग्यसेवा, अस्थापनना आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून 50 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.
तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग, कार्यालय प्रमुखांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असंही त्या आदेशात म्हटलं आहे.
नाट्यगृहे, सभागृह यांची उपस्थिती देखील 50 टक्के असावी त्याचप्रमाणे त्यांचा उपयोेग धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नसल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे नविन आदेशांचं नागरिकांनी पालन न केल्यास, त्यांच्यावर सरकार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
नाट्यगृहासाठी नविन नियम-
- मास्क घातल्याशिवाय प्रवेश करण्यास परवानगी नाही.
- ताप किंवा शरिराचं तापमाण जास्त असलेल्या कोणत्याही व्यक्तीला नाट्यगृहात प्रवेश मिळणार नाही.
- वेगवेगळ्या सोईस्कर ठिकाणी हात सॅनिटायझर ठेवले पाहिजे.
- अंमलबंजावणीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अस्थापने.
दरम्यान, वाढता कोरनाचा संसर्ग लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना एक मागणी केली होती.
राज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लसीकरणाला चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहेत. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उदिष्ट असून त्यासाठी 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राजेश टोपे यांनी हर्षवर्धन यांच्याकडे केली होती.
तसेच महाराष्ट्र राज्यासोबतच देशातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असल्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोनाची दुसरी लाट कशी थोपवून लावायची याविषयी मार्गदर्शन केलं.
महत्वाच्या बातम्या-