कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी सुद्धा राज्यात 26 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक 11 रुग्ण आढळले आहे. तर नांदेडमध्ये सुद्धा 2 रुग्ण आढळले आहे. राज्यात आता ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे.

एकीकडे रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

जानेवारीच्या मध्यापर्यंत आरोग्य विभागाकडून ओमायक्रॉन संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्स (Covid Task Force)सक्रिय झाला आहे. टास्क फोर्सनी जम्बो हॉस्पिटलमध्ये तयारीसाठी मॉक ड्रिल सुरू केल्या आहेत.

कोविड टास्क फोर्स सिरीज पंप, मल्टी-पॅरा मॉनिटर्स, व्हेंटिलेटर यांच्यासह पाइपलाइन चाचणी तसंच पॅथॉलॉजीच्या चाचणीसाठी ड्रिल करत आहे. कोविड टास्क फोर्सचे पथक सध्या ड्रिल करत आहेत जी स्पष्टपणे संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी आहे. जेणेकरून परिस्थिती आणखी बिघडली आणि मुले कोरोनाच्या विळख्यात आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करता येतील, असं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

टास्क फोर्सनं संपूर्ण वॉर्डातील मुलांसाठी खेळणीही तयार केली आहेत. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहिल्याने मुलांना त्रास होऊ नये म्हणून प्रभागात स्वतंत्र पालकत्वासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णवाढीनं कमालीचा वेग पकडला आहे. कोरोनाचा नवा विषाणू पुन्हा एकदा गुणाकार करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आकडेवारीतून पाहायला मिळालंय.

एकीकडे रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन (lockdown) लागेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी लॉकडानऊबाबत भाष्य केलं आहे.

तिसरी लाट म्हणून सरकार याकडे पाहत आहे. तज्ज्ञांचं मत आहे की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे गरज पडली तर निर्बंध कडक केले जातील, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ 

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

ओमिक्रॉनचं ‘हे’ पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध

“मी रिटायर झालेला माणूस, आता मला कोण विचारतंय?”

काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव