लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विलासरावांच्या बाजूला गोपीनाथरावांचं स्मारक उभारणार!

लातूर | लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सध्या विलासराव देशमुखांचा पुतळा आहे. आता या पुतळ्याच्या बाजूलाच गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. त्यासंबंधी ठराव लातूर जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत घेतला आहे.

पुतळ्यासाठी साठ लाख रुपये खर्च येणार आहे. राजकारणातील नव्या पिढीला या दोन मित्रांच्या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केला.

विलासराव देशमुख लातूरचे, तर गोपीनाथ मुंडे बीडचे. त्याकाळी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. मैत्रीला अनुसरुन या राजकीय मित्रांचं स्मारक शेजारी शेजारी उभारण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातलेत पण…- राजू शेट्टी

-सुशांतचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या टीमनं घेतला मोठा निर्णय

-भारत कोरोनाचं संकट संधीमध्ये बदलेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

-…तर ही विधानपरिषदेची ब्याद मला नकोच- राजू शेट्टी

-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी; रिया वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल