कृषीमंत्री दादाजी भुसे यांचं शेतकऱ्यांना ‘हे’ कळकळीचं आवाहन

सोलापूर | पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असं आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सोलापुरात केलं आहे. कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्याचा खताचा पुरवठा उपलब्ध करुन दिला जाईल. मागेल त्याला शेततळे, शेततळ्याला कागद आणि इतर योजनांसाठीच्या थकित अनुदानापोटीचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं यावेळी कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

सोयाबीनच्या बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत पंचनामे करा. त्याच कंपनीच्या बियाण्याबाबत पुन्हा तक्रार आल्यास त्याबाबत पुढील कार्यवाही करावी लागेल, याकडे लक्ष द्या, असे त्यांनी सांगितले. ज्या बँका पीककर्ज देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा, असंही कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

कृषी विभागाने 15 दिवसांपूर्वीच खते-बियाणांचे नियोजन पूर्ण केले. सोलापूर जिल्ह्यात 27 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. खताच्या बाबतीत कमतरता नाहीये. युरियाचे एक आवंटन येणे बाकी आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

-मुंबईतली कोरोना स्थिती कधी नियंत्रणात येईल?, महापालिका आयुक्तांनी सांगिती तारीख!

-संजय राऊतांनी शिवसेनेचे सोडून काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले का?; विखे-पाटलांचा पलटवार

-अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा; मराठा ठोक क्रांती मोर्चाची मागणी

-चीनी कंपन्यांसोबतचे करार ठाकरे सरकारने रद्द केले नाहीत तर….; सरकारकडून स्पष्टीकरण

-…तर कोणतीही शिक्षा भोगेन; हसन मुश्रीफांचं चंद्रकांतदादांना खुलं आव्हान