राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याहसह…; मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्या अगोदरच कोरोनाचे विघ्न!

अयोध्या | अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जवळ आला असताना राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यासह तेथील बंदोबस्ताला असणाऱ्या 16 पोलिसांना कोरोना झाला असल्याची माहिती आहे.

रामजन्मभूमीच्या जागेची पूजा करणारे पुजारी प्रदीप दास यांच्या करोना चाचणीचे निकाल पॉझिटीव्ह आले आहेत. आचार्य सत्यंद्र दास यांचे शिष्य असणारे प्रदीप हे रामजन्मभूमीच्या प्रमुख चार पुजाऱ्यांपैकी एक आहेत. दास यांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने त्यांना होम क्वारंटाईण करण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत.

राम मंदिराचा मुहुर्त जवळ असताना अचानक ही धक्कादायक बाब समोर आली आहे. बुधवारी काही प्रसार माध्यमांनी दास यांची मुलाखत घेतली होती. त्यामुळे तिथे भीतीचं वातावरण आहे. कारण फक्त त्यांनाच झाला नसून मंदिराच्या प्रार्थनाजवळ सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या 16 पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समजली आहे.

दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिर भूमीपूजन सोहळा पार पडणार होता. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान 150 निमंत्रितांसह एकूण 200 जणं उपस्थित राहणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली होती.

महत्वाच्या बातम्या-

विधान परिषद मागायला भाजप नेत्यांच्या पायऱ्या झिजवणाऱ्यांनी पाटलांवर आक्षेप घेऊ नये- राम कदम

“महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्या”

“भाजपच्या राष्ट्रीय वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, भाजपने जाहीर माफी मागावी”

पुणे हादरलं! पुण्यातील कर्वेनगरमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या करत केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दिलं ‘हे’ कारण

नरेंद्र मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधींची मोदींवर जोरदार टीका!