मनोरंजन

ऐश्वर्या रायचा 24 वर्षापूर्वीचा सेक्सी लूक सोशल मीडियात व्हायरल, पाहा फोटो-

ऐश्वर्या रायचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो  24 वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे.

तिचा नुकताच ‘फन्ने खान’ नावाचा चित्रपट येऊन गेला. त्याची बॉक्स ऑफिसवर फारशी जादू चालविली नसली तरी ऐश्वर्याची चर्चा मात्र जोरदार झाली. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या पहिल्यांदाच रॉकस्टारच्या भूमिकेमध्ये झळकली होती.

ऐश्वर्याच्या चाहत्याने तिचा एका जुना फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सर्वत्र व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

ऐश्वर्या फॅन क्लबवर शेअर झालेल्या या फोटोमध्ये ऐश्वर्या प्रचंड सुंदर दिसत आहे. ज्यावेळी ऐश्वर्या मॉडेलिंग करत होती. त्यावेळचा हा फोटो असून यामध्ये अॅशने पांढऱ्या रंगाचा क्रॅपटॉप आणि ब्ल्यु कलरची जीन्स घातली आहे.

ऐश्वर्याचा फॅशनसेन्स उत्तम असल्याचं हा फोटो सांगत आहे. ऐश्वर्या आता एका मुलीची आई आहे. मात्र तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही.

IMPIMP