मुंबई | बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. अशाच नेहमीत चर्चेत राहणाऱ्या कलाकारांंपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन. बॉलिवूड मधील एक आदर्श जोडपं म्हणून या जोडप्याकडे पाहिलं जातं.
विश्वसुंदरीचा किताब मिळवणारी ऐश्वर्या एकिकडे बॉलिवूडमध्ये अगदी टॉपला होती. कित्येक मोठ मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी तिला मिळत होती. या विश्वसुंदरीचे जगभरात चाहते होते. तर दुसरीकडे अभिषेकला चित्रपट विश्वात अपयशाचा सामना करावा लागत होता. त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरत होते.
अशातच ऐश्वर्याने बॉलिवूडचे बीग बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही वार्ता ऐकल्यानंंतर तिच्या चाहत्यांना मोठा शॉक बसला होता. ऐश्वर्याने अभिषेकला जोडीदार म्हणून निवडणं हे अनेकांना आश्चर्यचकीत करणारं होतं.
परंतु हे लग्न करण्यामागे काही कारणं होती. याविषयी ऐश्वर्याने स्वत: एका मुलाखतीत खुलासा केला होता. यावेळी ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न करण्याचं आणि बीग बींची सून होण्यामागचं कारण सांगितलं होतं.
यावेळी बोलताना ऐश्वर्या म्हणाली होती की, अभिषेक एक धाडसी आणि नाईट इन शायनिंग आर्मर आहे. तो नेहमीच आयुष्य मनमुरादपणे जगत असतो. जगण्याला बिनधास्तपणे कवेत घेणारा तो व्यक्ती आहे. थोडासा वेंधळा आहे पण समजायला तितकाच सोपा देखील आहे.
अभिषेकची हीच गोष्ट मला आवडते. प्रत्येक गोष्टीला कॅलरीमध्ये मोजणाऱ्या व्यक्तीसोबत मी राहूच शकत नाही. अभिषेकच्या याच बिनधास्त स्वभावावर माझं प्रेम आहे, असं ऐश्वर्याने यावेळी सांगितलं होतं.
दरम्यान, अलिकडे ऐश्वर्या चित्रपट विश्वापासून लांब आहे. तसेच अभिषेक देखील फारश्या चित्रपटात दिसत नाही. मात्र, एकेकाळी या दोघांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून कियारा ‘शेरशाह’ चित्रपटात डिंपलची भूमिका साकारल्यानंतर रडली होती; वाचा सविस्तर
इंदिरा गांधींची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचे वडील होते इंदिरा गांधींचे खासगी पायलट
जिममध्ये तरुणावर अदृश्य शक्तीने केला हल्ला अन्…; हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नका
सीतेच्या भूमिकेसाठी करीनाने 12 कोटी रुपये मागितले का? करीना मौन सोडत म्हणाली…