देश

आजारपणातून बरं होताच अकबरुद्दीन ओवैसींकडून ‘15 मिनिट’वाल्या वक्तव्याचा पुनरुच्चार

हैदराबाद | खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू आणि एमआयएमचे वादग्रस्त नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी आजारातून बरं होताचा पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या जुन्या ‘१५ मिनिटं’वाल्या वक्तव्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे.

आजारपणातून बरं झाल्यानंतर ओवैसी यांनी करीमनगरमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी माॅब लिंचिंगसंदर्भात मुस्लिमांना आवाज तीव्र करायला सांगितला.

देशातील मुस्लिमांनी वाघ बनायला हवं, ते वाघ बनले तर त्यांच्यापुढे देशातील कुठलाही चहावाला उभा राहू शकत नाही, असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले.

लोक आज झुंडबळीबाबत बोलतायत. मी आपल्या लोकांना सांगतो की तुम्ही किती त्रस्त आहात. असे त्रस्त होऊ नका. आम्ही जे काही इथे करू, त्याच्या बदल्यात स्वर्ग किंवा नरक मिळेल असे मी तरुणांना सांगू इच्छितो. शहीद हा नेहमीच स्वर्गाच्या स्वर्गात जातो. तरुणांनो, त्यांना कोणतीही घोषणा देऊ द्या, तुम्ही फक्त अल्लाहचे नाव घ्या, असंही ते यावेळी म्हणाले.

हौतात्म्याची भावना असेल तर कुणीही झुंडबळी घेणारा किंवा आरएसएसवाला तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. सौ सुनार की एक लुहार की, १५ मिनिट एक अशी जखम आहे जी अजूनही भरु शकली नाही. ते घाबरतात म्हणूनच अकबरुद्दीनचा द्वेष करतात, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, अकबरुद्दीन ओवैसी यांच्या या भाषणानंतर ते वादात अडकण्याची शक्यता असून मोठा वाद उभा राहू शकतो.

महत्वाच्या बातम्या-

-फडणवीसांची महाजनादेश यात्रा; उद्घाटनाला शहा तर समारोपाला मोदी

-विराट कोहलीला इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी मिळणारी किंमत ऐकून थक्क व्हाल!

-मॉब लिंचिंगविरोधात 49 कलाकारांचं पंतप्रधानांना पत्र

-असला कसला विश्वविजेता?; आयर्लंडविरुद्ध इंग्लंडचा संघ अवघ्या 85 धावात गारद

-अखेर हुकुशाहीचा उदय झालाच; धनंजय मुंडेंचं भाजपवर टीकास्त्र

IMPIMP