मुंबई | बुधवारपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन हे अधिवेशन पार पडत आहे. यंदा हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत पार पडत आहे. (Speech by Ajit Pawar in the House)
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाचं कामकाज चांगल्या प्रकारे पार पडलं. भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळे सभागृहाचं कामकाज देखील तहकुब करण्यात आलं आहे.
अशातच आज सुरू असलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहातील आमदारांना खडे बोल सुनावले आहेत. मास्क न घातलेल्या आमदारांना अजित पवारांनी सुनावलं.
आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीवरून वाद पेटला होता. आपल्यामार्फत मला सभागृहाचं लक्ष एका विषयाकडे वेधायचं आहे, असं म्हणत अजित पवारांनी अध्यक्षांची परवानगी घेऊन बोलण्यास सुरूवात केली.
चार पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व घेऊन दोन्ही बाजूचे सदस्य बसले आहेत. स्वत: देशाचे पंतप्रधान कोरोनाच्यासंदर्भातील संकट आहे त्याबद्दल गांभीर्याने विचार करता आहेत, असं अजित पवार म्हणाले.
कोरोनाच्यासंदर्भातील गांभिर्याने विचार होत आहे. तर रात्रीच्या वेळी लाॅकडाऊन लावण्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. असं असलं तरी काही ठरावीक सदस्य सोडले तर बाकी कोणीही याठिकाणी मास्क लावत नाही, असं अजित पवार म्हटले आहेत.
इथं काय सुरू आहे हे संपुर्ण महाराष्ट्र बघतोय. आम्ही लोकप्रतिनिधीच जर मास्क लावत नसू तर कसं होणार, असं म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मास्क घातलं नसेल तर अगदी मलाही बाहेर काढा असंही अजित पवार म्हणाले.
काही जण बोलण्यासाठी मास्क काढतात, हे मान्य आहे. त्यामुळे व्यवस्थित बोलता येत नाहीये. पण बोलून झाल्यावर देखील मास्क लावलं पाहिजे ना?,असंही अजित पवार म्हटले आहेत.
परदेशात दुप्पट तिप्पट रूग्णसंख्या होत चालली आहे. पाच लाख लोकं मृत्यूमखी पडतील असं आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे, अशी माहिती देत त्यांनी कोरोनाचं गांभिर्य देखील आमदारांना समजून सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“…तर मी नाक घासून चंद्रकांत पाटलांची माफी मागेल”
आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, फडणवीस म्हणाले ‘मी स्वत: कर्नाटकात जातो अन्…’
आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ
शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?
‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं