मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी महाविकास आघाडीवर सडकून टीकास्त्र सोडलं. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांवर देखील निशाणा साधला होता. आता राणेंनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कोकणात आम्ही काय मदत केली हे सगळ्यांना माहिती आहे. तौक्ते चक्रीवादळात मदत केली. बंधारे बांधतोय. राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा ते बी केंद्रात मंत्री आहेत. त्यांनीही निधी आणावा. कामं करावी, असा सल्ला अजित पवारांनी नारायण राणे केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीय. त्यांनी चांगलं काम करून दाखवावं, असं म्हणत अजित पवारांनी राणेंवर टीका केली आहे.
काही लोक वेगळा प्रचार करत आहेत. काही जागा मी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने आम्हाला यश आलं नाही. आम्ही आमच्या परीने आमच्या विचाराचे लोक निवडूण आणण्याचा प्रयत्न करतोय. हवेली पुणे, पिंपरी चिंचवडनंतर विचार करायचा झाल्यास सर्वात जास्त मतदान बारामती येथे झाले आहे. बारामती येथे सातशे मते असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
गेली तीस वर्षांपासून आम्ही बँक चांगल्या प्रकारे करत आहोत. यावेळी लोकांनी सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे. दोन महिला, क आणि ड वर्गात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत कोणी जातीवादाचा तर कोणी पाहुणे असल्याचा आरोप केला आहे, असं ते म्हणालेत.
आम्ही पाच लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना देतो. जनरल निवडणुकीत सोपे जाते. मात्र, येथे मतदार कमी असल्यामुळे ही निवडणूक जिकरीची होते. काही प्रलोभने मिळाली तर अवघड होऊन जातं, अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यपाल ही महत्वाची व्यक्ती आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सातत्याने खबरदारी घेतोय. सातत्याने लोकायुक्तांकडे तक्रारी येतात. यामध्ये तथ्य असेल, तर वस्तुस्थिती सगळ्यांसमोर येईल, तथ्य नसेल तर त्यांच्याही लक्षात येईल की हे चुकीच्या पद्धतीने तक्रारी करतात असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
नवरीच कोरोना पॉझिटिव्ह!; ठाकरेंच्या नव्या सूनबाईंनी दिली माहिती
कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये?, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती
Omicron पासून वाचण्यासाठी असा करा स्वत:चा बचाव; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील काही भागात पावसाची शक्यता
‘या’ महिन्यात भारतात दररोज 2 लाख रूग्ण आढळतील, तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ