अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या अनेकांच्या काही चुका झालेल्या आहेत. त्या झाकण्यासाठी त्यांनी पक्षांतर केले आहे. सहकारी संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नाहीत याचे भानही अनेकांना राहिले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अकोलेमधील सभेत केली.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पिचड पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे. या सभेत पवार यांनी पिचड यांच्यासह पक्ष सोडून गेलेल्या इतर नेत्यांवरही टीका केली.
स्थानिकांचा विरोध डावलून आम्ही पिचड पिता-पुत्रांना पक्षात मानाचे स्थान दिले. राज्यातील आणि सहकारी संस्थांमधील महत्वाची पदे दिली. तरीही त्यांनी पवारांचा विश्वासघात केला, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
साखर कारखाना असो की इतर संस्था, तेथे काय चालतं हे आम्हालां माहिती आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नाहीत, याचे भान ठेवले पाहिजे. आपल्या चुका झाकण्यासाठी राजे, नेते, सेनापती सोडून गेले आहेत. त्यांना जाऊ द्या, आता नवीन पिढी आणि महिलांना संधी देण्यात येत आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे दाखवून देण्यासाठी अशा लोकांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मराठवाडा आणि विदर्भ कायम दुष्काळी राहिला- प्रकाश आंबेडकर – https://t.co/pPWKu19E4m @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
कॉंग्रेसला मोठा धक्का, या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा – https://t.co/YDcnCbZ09o @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
“तिकीट देत असाल पक्षात थांबतो नाही तर पक्ष सोडतो”https://t.co/D6e3s4LoD8
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019