“एवढी साधी गोष्ट कळत नाही का?”, भर सभागृहात अजित पवार संतापले

मुंबई | विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं होतं. (Ajit Pawar angered MLAs)

सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात अनेक विधेयकं पारित झाली आहे. त्यामुळे अधिवेशनात कामकाज चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांचे कान टोचले आहेत.

अजित पवार यांनी विधानसभेत बेशिस्त आमदारांना खडे बोल सुनावले आहेत. आपण कसे वागतोय याचं सदस्यांना जराही भान राहिलं नाही, असं अजित पवार म्हणाले.

सभागृहात येताना किंवा जाताना सदस्यांना नमस्कार करायचा असतो, याचं जरासही भाण राहिलं नाही. काही सदस्यांनी निवेदन दिल्यानंतर पुन्हा निवेदन देण्यास येतात, असंही अजित पवार म्हणाले.

एक सदस्य थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जाऊन बसला. शेवटी त्याला अरे ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे. त्याला तरी राहू दे, असं म्हणण्याची वेळ आली आहे, असं म्हणत अजित पवारांनी सभागृहातील सदस्यांची कान उघडणी केली आहे.

सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. इथं कोणीतरी बोलत असतं त्यावेळी अध्यक्षांकडे पाठ असते. अरे अध्यक्षांकडे पाठ करायची नसते. बोलून झालं की त्यांना नमस्कार करून बसायचं असतं, असंही अजित पवारांनी सभागृहाला सांगितलं.

येता जाताना नमस्कार करायचा असतो, एवढी साधी गोष्ट कळत नाही का?, असा सवाल देखील अजित पवारांनी विचारला आहे.

दरम्यान, काही सदस्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला नक्की तडा गेला आहे‌. आता सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असं आवाहन देखील अजित पवारांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

रोहिणी खडसेंवरील हल्ल्यानंतर एकनाथ खडसे संतापले, म्हणाले…

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

“पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत”

राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

“वडिलांच्या खांद्यावर बसूनही अजित पवार यांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही”