Top news महाराष्ट्र मुंबई

“दादा, दोन हाणा पण मला आपलं म्हणा…” कार्यकर्त्यानं पेपरात दिली जाहिरात

बारामती | दादा… आता सहन होत नाही, माफ करुन अबोला सोडावा, असं म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांची वर्तमानपत्रातून जाहीर माफी मागितली आहे. नितिन हिंदुराव देशमुख असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे नितिन हिंदुराव देशमुख याच्यासोबत गेले दीड वर्ष अजित पवार बोलले नाहीत. त्यामुळे दादा दोन हाणा, पण मला आपलं म्हणा, असं नितिन हिंदुराव देशमुख यांनी म्हटलं आहे.

नितीन देशमुख यांनी अजित पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दादांच्या मनधरणीचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. दोन हाना, पण मला आपलं म्हणा, मला माफी, हेच तुमचं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, अशी जाहिरातच नितिन देशमुख यांनी वर्तमानपत्रात दिली आहे.

“दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक, माफ करा…तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा. 23 नोव्हेंबर 2019 रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या. दादा, मी अपरिपक्व होतो, भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली.
दोन वर्षे मी स्वतःला पश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिलं आहे. पण दादा, आता सहन होत नाही.”

संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी आदरभाव व्यक्त करतोय, मलाही दादा आज मन मोठं करुन आशिर्वादरुपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या, असं नितिन देशमुख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं…

हृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ! चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा…

चर्चा तर होणारच! ‘या’ विद्यार्थ्यानं बनवला…

कौतुकास्पद! मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय…

धक्कादायक! कोरोना नष्ट करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा…

IMPIMP