मुंबई | महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. हरित निधी उभा करण्यासाठी राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर एक रुपया अतिरिक्त अधिभार लावण्याचा प्रस्ताव त्यांनी अर्थसंकल्पात मांडला आहे. यामुळे 1 एप्रिलपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेल एक रुपयांनी महागणार आहे.
जागतिक तापमान वाढ हा जटिल प्रश्न सध्या सगळ्यांनात सतावतो आहे. त्यामुळे त्यावर उपाय योजणे सगळ्यांसाठी गरजेचं बनलं आहे. याच उपाययोजनांसाठी हरित निधी उभा करण्याचे सरकारने ठरविले आहे. या निधीसाठी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर एक रुपया अतिरिक्त अधिभार आकारण्यात येणार आहे.
आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यात आपल्यापेक्षा पेट्रोल, डिझेल महाग आहे. तेथील सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी अर्थसंकल्पानंतर पेट्रोल डिझेल दरवाढीचं समर्थन केलं.
सरकारचे 100 दिवस आज पूर्ण झाले असं पवार म्हणाले. सध्याचा काळ आर्थिकदृष्ट्या गुंतागुंतीचा आणि कसोटीचा आहे. देशपातळीवरील बाबींचा परिणाम राज्यावरही जाणवतोय. मंदीमुळे तणावाखाली असलेली जागतिक अर्थव्यवस्था कोरोना व्हायरसमुळे अधिक तणावाखाली आली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडण्यात येत आहे., असं अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-अर्थसंकल्पात कुणाला काय काय मिळालं?; वाचा एका क्लिकवर
-राज्यातील 80 टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
-बळीराजाला हेलपाटे न मारावे लागता आमच्या सरकारनं कर्जमाफी दिली- अजित पवार
-नियमीतपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांचा दिलासा
-छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला?; मनसेनं घेतला आक्रमक पवित्रा