“अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर त्यांनी भाजपसोबत या”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांना जर उपमुख्यमंत्रिपद मिळालं नाही तर त्यांनी भाजपसोबत यावं. आपण मिळून सरकार चालवू, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

अजित पवारांनी अभ्यास न करता भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करता आले नाही. जर हे सरकार चाललं नाही तर पुन्हा भाजप सरकार स्थापन करु शकते. त्यामुळे अजित पवारांनी भाजपला पुन्हा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर त्यांनी अभ्यास करुन यावे, असंही ते म्हणाले आहेत.

सर्व आमदार माझ्यासोबत आहे असं अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं. त्यामुळे सकाळी सकाळी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अजित पवारांचा अभ्यास कमी पडला, असंही ते म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार चालेल. शिवसेवा पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी बंड करत भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, नंतर आमदारांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती.

महत्त्वाच्या बातम्या-