देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर अजित पवार म्हणाले…

सातारा | माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीबद्दल केलेल्या गौप्यस्फोटावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नो कमेंट, त्या ऑफरवर मला काहीच बोलायचं नाही. तो माझा अधिकार नाही. या विषयावर शरद पवार बोलतात, असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांनी याआधी प्रमाणेच याविषयावर बोलण्यास टाळाटाळ केली.

साताऱ्यात आज रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनिमित्तीने शरद पवार, अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी नेते साताऱ्यात उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाचा आढावा घेतला. कोणतीही कमतरता सरकारकडून भासणार नाही. सातारा येथे सोमवारपर्यंत कोविड चाचणी सेंटर सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पडळकरांच्या त्या जहाल टीकेवर शरद पवार अखेर बोलले, म्हणाले…

-राष्ट्रवादीने आम्हाला ऑफर दिली होती म्हणणाऱ्या फडणवीसांना पवारांनी दिलं उत्तर

-शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट; साताऱ्यात चर्चांना उधाण!

-वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यभरात….; उर्जामंत्र्याचे स्पष्ट निर्देश

-ठाणे जिल्ह्यात कोरोना धुमाकूळ… मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना