पुणे महाराष्ट्र

अजित पवार श्टाईल… वाढदिवस तुझा व्हायचा अन् वाट माझी लागायची!

पुणे |  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एक भाषणाची स्टाईल निर्माण केली आहे. ग्रामीण भाषेत आणि रांगड्या शैलीत अनेकदा ते आपल्या भाषणांमधून कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कानपिचक्या देत असतात. असाच अनुभव काल बारामतीतल्या एका कार्यक्रमात लोकांना अनुभवयाला मिळाला.

कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या वाढदिवसाला ते एकमेकांना शुभेच्छा देत असतात. परंतू हाच किस्सा अजित पवार यांनी मोठ्या गमतीने आणि खुबीने लोकांना सांगितला. 

मी घरी एक खुर्ची रिकामी खुर्ची ठेवलेली आहे. एखादा कार्यकर्ता येतो… वाढदिवस आहे असं सांगतो… मग मी त्याला शेजारी बसायला सांगतो आणि त्याच्या इच्छेनुसार फोटो काढून देतो…. फक्त त्याचा व्यवसाय चांगला असायला पाहिजे. नाहीतर दारू, मटक्याचा धंदा करणारा असायचा आणि आमची वाट लागायची…!, असं ते म्हणाले. यानंतर उपस्थित लोकांच्यात हास्याचे फवारे उडाले.

बारामतीत काल अजित पवार यांच्या हस्ते डॉ. पवार हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. हॉस्पिटलच्या नावावरून देखील त्यांनी विनोद केला. डॉक्टरांचा आणि माझा काही संबंध नाही बरं का… नाहीतर तुम्ही यायचे माझ्याकडे आणि मोफत उपचार करून द्या म्हणायचे… असं म्हणताच लोकांमध्ये खसखस पिकली.

अजित पवारांच्या या विनोदपूर्ण भाषणावर आणि किस्स्यांवर बारामतीकर मनमुराद हसले आणि जोरदार टाळ्यांनी त्यांनी अजित दादांच्या भाषणाला दाद दिली.

दरम्यान, कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या फोटोवरून अजित पवार अनेकदा अडचणीत सापडले आहेत. याच प्रकारामुळे अजित पवार सावध झाले आहेत.

IMPIMP