पुणे महाराष्ट्र

30 वर्षांचा अनुभव पणाला लावणार; पण विधानसभेला ‘इतक्या’ जागा जिंकणार- अजित पवार

सोलापूर :  माझा 30 वर्षांचा अनुभव मी पणाला लावणार पण आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 175 जागा जिंकणार, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजपला आव्हान दिलं आहे.

आमचं सरकार सत्तेत आल्यास सरकारी आणि खासगी नोकरीत 75 टक्के आरक्षण लागू करू, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे. ते आज सोलापूरात बोलत होते.

लोकसभेला आम्हाला वंचितमुळे 12 जागांवर फटका बसला. पुरोगामी शक्तींनी जातीयवादी शक्तींविरोधात एकत्र यावं. म्हणूनच वंचितने आमच्याबरोबर येऊन जातीयवादी शक्तींचा मुकाबला करायला हात बळकट करावेत, असं आवाहन अजित पवार यांनी वंचितला केलं आहे.

सरकार आज अनेक संस्थांचा वापर करत विरोधकांना घाबरवण्याचं काम करत आहे. आमचं सरकार सत्तेत असताना आम्ही अशा प्रकारचं काम कधी केलं नव्हतं, असंही ते म्हणाले.

अजित पवार सोलापूरात मुलाखत घेण्यासाठी पोहचले मात्र सोलापूरातील मुलाखतीला पक्षाचे 2 विद्यमान आमदार गैरहजर होते. माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल या दोन विद्यमान आमदारांनी मुलाखतीसाठी अजित पवारांकडे जाण्याचं टाळलं असल्याचं समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मराठा मोर्चा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला जामीन मंजूर

-मुलाखत घ्यायला अजित पवार सोलापूरात गेले अन् राष्ट्रवादीचे 2 आमदारच गायब झाले!

-शरद पवार कुठं भेटले तर हात जोडून माफी मागेल आणि ते मला….- सचिन अहिर

‘पार्थ इज बॅक’! विधानसभेसाठी ‘ही’ महत्वाची जबाबदारी उचलायला सज्ज

-पवार घराण्याला पराभव दाखवणाऱ्या शिवसेना खासदाराचं मोदींकडून कौतुक!

IMPIMP