मुंबई | तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे. तिजोरीच्या चाव्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. नाहीतर ते काय देणार घंटा, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार फटकेबाजी केली.
पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस वातानुकूलित नुतन वस्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पावर बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
संजय जगताप आणि दत्ता मामांना सांगावं लागतं. आमच्याही तालुक्यावर लक्ष ठेवा, फक्त तुम्ही राज्यमंत्री इंदापूरचे नाही. मलाच विनंती करावी लागते, मला तरी काही तरी द्या, असं अजित पवार पवारांनी म्हटलंय.
बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहे, पण त्यांना माहिती नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे, असं अजित पवार म्हणालेत.
तिजोरीच्या चाव्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. मी तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार घंटा…, असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकलाय.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दत्ता मामा राज्यमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यासाठी चांगला निधी आणला आहे, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘धोनीमुळे मी…’; विजयानंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा
“मेहबुबा मुफ्ती भाजपच्या मैत्रीण होत्या, मुफ्तींना भाजपनेच बळ दिलं”
यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्या; आयकर विभागाला सापडलेल्या डायरीने खळबळ
काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला मोठा झटका; न्यायालयानं सुनावली ‘इतक्या’ वर्षाची शिक्षा
“बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांना सांगणार आहे”