लातूर | नगरपालिकेला 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. मात्र एक अट आहे. तुम्ही जर औसा नगर पालिकेत पुन्हा राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला निवडून दिले तरच हा निधी तुमच्याकडे येईल, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे.
औसा (Ausa, Latur) येथील नगरपालिकेच्या विकासकामाच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.
औसा नगर पालिकेत राष्ट्रवादीच्याच पॅनलला म्हणजे डॉ. अफसर शेख यांच्या पॅनलला निवडून दिले तरच मी तुम्हाला 100 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देतो, हा माझा शब्द आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही लोक उघड्यावर शौचास बसतात, ही लाजिरवाणी बाब आहे. स्वच्छता अभियानात एकदाच पारितोषिक मिळवून चालणार नाही, तर त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी जनतेनेही आपली जबाबदारी पार पाडावी, असं अजित पवार म्हणालेत.
लातूर येथे आगमन झाल्यानंतर पवार यांनी लसीकरण संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. कमी झालेल्या लसीकरणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, डॉक्टर, नर्सेस लस घेऊन तयार आहेत. मात्र, लोक लस घ्यायला गेले नाहीत. आता याला काय करावं? लसीकरणाबाबत अशीच स्थिती राहील्यास कठोर निर्बंध लावण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
औसा शहराच्या विविध विकासकामांसाठी जवळपास 100 कोटी रुपयांची गरज आहे. सुदैवाने मी आज तुमच्यापुढे राज्याचा अर्थमंत्री म्हणून उभा आहे. यामुळे मागच्या वेळीसारखे डॉ. शेख यांना व त्यांच्या नेतृत्वाखालील सर्वांना निवडून द्या. मी 100 कोटी रुपये विकासकामाला देईल, असा शब्द त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
“पवार हवेत गप्पा मारणारे नव्हेत, यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेलं सर्वात मोठं नेतृत्व”
“26 खासदार असणारा गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा…”
“शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं हा इतिहास आहे”
मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज; उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ओ