मुंबई : ठाकरे सरकारचा विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव पार पडला. 169 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतं दिली. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव महाविकास आघाडीनं जिंकला. मात्र, काल भाजपकडून सभागृहात गोंधळ घालण्यात आला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेत आले आहेत. भाजपने दिलदारपणाणे, खेळाडूवृत्तीनं हे सर्व स्वीकारायला हवं होतं. मात्र, भाजपने गोंधळ घालत सभात्याग केला हे दुर्दैवी आहे, असं पवार म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
जो ठराव मान्य झाला त्याचं भाजपनं कौतुक करायला हवं होतं. सत्ता येणं आणि जाणं हे लोकशाहीत होतच असतं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे नेणारा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडत असताना ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा भाजप आमदारांकडून देण्यात आल्या. त्यांनंतर भाजप आमदारांनी सभात्याग केला.
महत्त्वाच्या बातम्या-
“…म्हणून मी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला” – https://t.co/7lDcVWMzyG @rajupatilmanase @mnsadhikrut
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
“महाविकास आघाडीचं सरकार आणण्यामागे शरद पवारांचं मोठं योगदान” – https://t.co/wjEfNdKIEd @rautsanjay61 @PawarSpeaks @ShivSena @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकारणातील हरिश्चंद्र” – https://t.co/oXNAtHn9pz @RealBacchuKadu @BJP4Maharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019